top of page

महारेरा QPR तारखा 2026-27 आणि कारणे दाखवा नोटीस: बिल्डरांसाठी मराठी मार्गदर्शन

Oct 30
2 min read

महारेरा नोंदणीकृत प्रत्येक प्रकल्पासाठी दर तिमाहीला प्रगती अहवाल (QPR) भरावा लागतो. मे 2026 मध्ये महारेराने QPR न भरलेल्या 8,212 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस पाठवली, त्यापैकी 2,311 प्रकल्प पुणे विभागातील होते. बहुतेक बिल्डरांनी काहीही लपवले नव्हते, फक्त तारीख चुकली होती. QPR कधी भरायचा, नोटीस आल्यास काय करायचे आणि पुढे हे कसे टाळायचे, हे या लेखात सोप्या मराठीत दिले आहे.

QPR म्हणजे काय?

QPR (Quarterly Progress Report) म्हणजे तिमाही प्रगती अहवाल. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत, म्हणजे OC आणि Form 4 पोर्टलवर अपलोड होईपर्यंत, तो दर तिमाहीला महारेरा पोर्टलवर भरावा लागतो. त्यात हे असते:

  • बांधकामाची प्रगती: आर्किटेक्टचे Form 1 आणि इंजिनिअरचे Form 2

  • खरेदीदारांकडून आलेली रक्कम आणि तिचा वापर: CA चे Form 3

  • बुक आणि विक्री झालेल्या सदनिका, आणि मिळालेली रक्कम

  • मंजुरी, नकाशे किंवा न्यायालयीन प्रकरणांमधील बदल

QPR च्या तारखा 2026-27

तिमाही संपल्यानंतर 20 दिवसांच्या आत QPR भरावा:

  • ऑक्टोबर ते डिसेंबर 2026: 20 जानेवारी 2027 पर्यंत

  • जानेवारी ते मार्च 2027: 20 एप्रिल 2027 पर्यंत

  • एप्रिल ते जून 2027: 20 जुलै 2027 पर्यंत

  • जुलै ते सप्टेंबर 2027: 20 ऑक्टोबर 2027 पर्यंत

जुलै ते सप्टेंबर 2026 चा QPR 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत भरायचा होता. तो राहिला असेल तर नोटीस येण्याआधी आत्ताच भरा.

QPR चुकल्यास काय होऊ शकते?

  • कारणे दाखवा नोटीस, आणि ठराविक मुदतीत QPR भरून उत्तर देण्याची सूचना (मे 2026 च्या फेरीत 60 दिवस)

  • दंड (अलीकडच्या फेऱ्यांत प्रति प्रकल्प 50,000 रुपये असे वृत्त)

  • जाहिरात, मार्केटिंग आणि सदनिका विक्रीवर बंदी

  • प्रकल्पाचे बँक खाते गोठवणे

  • प्रकल्पातील दस्त नोंदणी थांबवण्याच्या सूचना दुय्यम निबंधकांना

  • नोंदणी स्थगित (abeyance) किंवा रद्द

कारणे दाखवा नोटीस आल्यास काय करावे?

  1. नोटीस नीट वाचा: कोणते QPR किंवा Form 5 बाकी आहेत आणि उत्तराची मुदत कधी आहे.

  2. आधी त्रुटी दूर करा: बाकी असलेले सर्व QPR भरा, फक्त शेवटचा नाही. नोंदणीची मुदत संपली असेल तर मुदतवाढ किंवा पूर्णत्वाचा अर्ज करा.

  3. प्रत्येक फाइलिंगची पोचपावती (acknowledgement) जपून ठेवा.

  4. थोडक्यात, मुद्देसूद उत्तर लिहा: काय बाकी होते, ते कधी भरले आणि उशिराचे कारण काय.

  5. मुदतीपूर्वी उत्तर सादर करा आणि नोटीस बंद होईपर्यंत पाठपुरावा करा.

  6. पुढच्या सर्व तारखा कॅलेंडरमध्ये तीन आठवडे आधीच्या आठवणीसह नोंदवा.

फाइलिंग न करता फक्त उत्तर पाठवल्याने सहसा काही उपयोग होत नाही. आधी फाइलिंग, मग उत्तर.

QPR वेळेवर भरण्याची सोपी पद्धत

  • तिमाही संपताच पहिल्या आठवड्यात साइटचा प्रगती डेटा गोळा करा.

  • आर्किटेक्ट, इंजिनिअर आणि CA यांना एकच डेटा शीट द्या, म्हणजे Form 1, 2 आणि 3 मधील आकडे जुळतील. पहा: Form 1, 2 आणि 3 (English).

  • बुकिंग आणि वसुलीचे आकडे अकाउंट्सशी जुळवा.

  • QPR बाकी असताना मुदतवाढ, दुरुस्ती यांसारखे इतर अर्ज अडकतात, म्हणून QPR सर्वात आधी.

संबंधित मार्गदर्शन

नोटीस आली आहे? आजच संपर्क करा

रोहिणी इंजिनिअर्सने पिंपळे सौदागर, पुणे येथील कार्यालयातून 8 पेक्षा जास्त वर्षांत 1,500+ प्रकल्पांचे महारेरा काम केले आहे. बाकी QPR भरणे, नोटिशीला उत्तर आणि नोटीस बंद होईपर्यंत पाठपुरावा, हे सर्व आम्ही करतो. पहा: आमच्या महारेरा सेवा, मोफत महारेरा प्रकल्प तपासणी, किंवा नोटिशीचा फोटो WhatsApp करा: +91 89995 29930.

Recent Posts

See All

Comments


bottom of page